Social

स्त्री अत्याचार आणि समाज

स्त्रीचा जन्म म्हणजे विधात्याने दिलेला आनंद मानायचा की दहशत हा सगळयात अवघड प्रश्न आहे.जन्मतः च स्त्री कडे गोडवा,कष्टाळू पणा ,सोशिकता आणि सगळ्यांनाच आपले समजून प्रेम करण्याची ताकद असते.एक स्त्री मग ती आई,बहीण,पत्नी किंवा मुलगी कोणत्याही रुपात तुमच्या आसपास असेल तर पुरुष एकाटा कधीच पडणार नाही कारण तिची समर्थ साथ आणि प्रेमळ सहवास मिळाल्यामुळे त्याचे जीवन सुंदर होतेच.पण त्याची जाण असणे आणि तिला योग्य तो सन्मान मिळाला तर ती कुठल्या कुठे जावू शकते.पण….

समाज म्हणजे तर काय?अनेक कुटुंबाचा समूह म्हणजेच समाज.म्हणून पाहिलेंदा कुटुंबाचा पाया भक्कम हवा.प्रत्येक घरात आपल्या मुलग्याला आणि मुलगीला समान आणि योग्य वागणूक मिळणे खूप गरजेचे आहे.बहुतेक कुटुंबे विभक्त आहेत.खूप कमी घरात आज्जी,आजोबा असतात.आई, वडील दोघेही नोकरी करणारे आणि घरी आल्यावर तेच इतके दमलेले असतात तर ते कितपत वळण लावू शकणार?त्यामुळे माझ्या मते शक्य तो एकत्र राहावे.

नात्यांमध्ये संवाद असावा. घर म्हंटले की मतभिन्नता आलीच पण संवादाने मार्ग निघू शकतो.या मध्ये मुलांचे लाड कितपत करावेत याचाही पालकांनी विचार करणे गरजेचे आहे.अलीकडे नको त्या वयात नको येवढे पैसे किंवा स्वातंत्र्य मिळत गेले की मुले बिघडतात.त्यांना तुम्ही केलेल्या कष्टांची जाणीव असणे गरजेचे आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या मुलांना शक्यतो जास्तीत जास्त वेळ देणे.ती काय करतात ?त्यांचे मित्र,मैत्रिणी कशा आहेत? ती कुठे जातात? त्यांनां कुठले व्यसन तर लागले नाही ना ?हे सगळे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.त्यासाठी आपण स्वतः चांगले वागणे,निर्व्यसनी असणे,प्रामाणिक असणे आणि मुलांसमोर कुठल्याही स्त्रीला मग ती कामवाली असली तरी योग्य आणि मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.आपण कसे आहोत याच्यावरूनच मुले घडत असतात.

स्त्री अत्याचार याला समाज माध्यम खूप कारणीभूत आहेत असेही माझे पक्के मत आहे.अलीकडे नको त्या वयात नको ती माहिती मुलांना कळते.अगदी जाहिराती सुदधा खूपदा भडक आणि मुलाच्या डोक्यात नाही ते प्रश्न पाडणाऱ्या
असतात.

चित्रपट या माध्यमातून तर खूप घाणेरडे प्रसंग नको इतके भडक पणे रंगवलेले असतात.याला अपवाद आहेत पण खूप कमी.मासिके ,पुस्तके या वरचीही ओंगळ चित्रे आणि अश्लील कथा,कादंबऱ्या या सगळ्याच कुठेतरी मानसिकता बिघडवत जातात आणि समाज बिघडत जातो.त्यात भर म्हणजे अलीकडे अगदी लहान वयातच मुलांना मोबाईल देतात.त्या वर मुले काय बघतात कोणाशी बोलतात हे सगळे बघणे,त्याला वेळ देणे अवघड होतं चाललंय.

मुलग्याला, मुलींना नक्कीच मित्र,मैत्रिणी असाव्यात त्यामुळे उलट त्यांचे आयुष्य प्रगल्भच होते हे मी माझी मुले आणि माझ्या आसपासची तरुण पिढी बघून म्हणेन पण त्यांच्यात एक संस्काराची आणि खरे पणाची रेघ हवीच.ती कुठेही जाऊदेत अगदी डिस्कोलाही अलीकडे मुले जातातच पण पालकांना येण्या जाण्याच्या वेळा ,त्याची माहिती,बरोबर असणारे सहकारी हे सगळे माहीत असणे गरजेचे आहे

स्वातंत्र्य असले तरी मर्यादा ही हवीच.एकटा मुलगा असो किंवा मुलगी तीला कायद्याची माहिती हवी.आणि कधीही रात्री,अपरात्री एकटे बाहेर फिरणे योग्य नाहीच.

काही स्त्रियांच्या वर घरातील आणि जवळच्याच नात्यातले लोक अत्याचार केलेले वाचले की पेटून उठायला होते.अशा घटना लपवून ठेवू नयेत.काही पुरुषांच्या वासनातून लहान मुलीही वाचत नाहीत.अशा वेळी कायदा आणि आपल्या न्याय प्रणालीचा मला प्रचंड राग येतो. अशा नराधम माणसांना भर चौकात लगेचच आणि सगळ्यांसमोर जाळायला,किंवा चाबकाचे फटके देवून मारायला हवे.

शेवटी कितीही काळ बदलला तरी स्त्री ही अबला आणि अगतिकच आहे .दुर्दैवाने अजूनही आपण सामूहिक बलात्कार झालेल्या बातम्या ऐकतो,वाचतो आणि चर्चा करून शांत बसतो.जो पर्यंत या विरुद्ध अक्खा समाज जागृत होत नाही,न्याय व्यवस्था कडक होत नाही तो पर्यंत स्त्री च्या नशिबी अत्याचारच आहेत.

Pooja Jadhav

"Hi, I am Pooja, I always wanted to write for women empowerment. I started the journey with blogging. So the purpose and goals of the website to provide resources, support, and inspiration to women from all walks of life, so they can overcome barriers and achieve their goals.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button