स्त्रीची बुद्धिमत्ता
एक स्त्री आणि तिची डिग्री यावरून मोजमाप केली जाते त्यांची हुशारी… ठीक आहे ही पण गोष्ट मान्य आहे की प्रत्येकाला अपडेट असणं हि काळाची गरज झाली आहे मग ते हाउसवाइफ असू कि कोणी साएनटिस्ट! बरोबर ना !!
खरं सांगायचं झालं तर नॉलेज (ज्ञान) असू कि नसू घरातल्या स्त्री ला नेहमी दुय्यम दर्जा दिला जातो. आज मला हीच गोष्ट माझ्या पद्धतीने प्रुफ करून दाखवायची आहे. माझ्यामते स्त्रीची बुद्धिमत्ता जास्त आहे. 2 पुरुषांच्या तुलनेत देखील तिची बुद्धिमत्ता जास्त आहे. आता ते कसं हे तुम्हाला प्रश्न पडला असणारे पण मी तेही तुम्हाला सांगू इच्छिते. एका स्त्रीच्या मानाने एक पुरुष एकावेळी घरातली कामे आणि बाहेरची कामे तो सांभाळू शकत नाही. पण मात्र स्त्री हि दोनीही काम अगदी प्रेमळ भावनेने आणि जबाबदारीने करते.
आता महत्त्वाचा पॉईंट तिची बुद्धिमत्ता. स्त्री दोनीही काम स्मार्ट पद्धतीने हॅन्डल करते कारण या जबाबदाऱ्या तिला करायच्याच आहेत. ती कोणावरही अवलंबून नाही राहू शकत. त्यामुळे ती तिचा दिवसाचा एक शेड्युल प्लान करते.
बुद्धिमत्ते विषयी सांगायचं म्हणजे तिचं स्वयंपाक घर. मी घर नाही बोलले,मी घरातले मेंबर देखील नाही बोलले, मी बोलले फक्त स्वयंपाक घर! तिचं किचन जे ती सकाळी रोज उठून त्या स्वयंपाक घरात मॅनेजमेंट करते तिच्या प्लॅनिंग सुरू करते. तिचा दिवस सुरू करते. पूर्ण आठवड्या भरायची प्लॅनिंग करते, की कोणत्या दिवशी कोणती भाजी करायची कोणाच्या टिफिन ला काय द्यायचे. संध्याकाळी काय करायचे. सकाळी काय करायचं. पूर्ण नियोजन आखून ती एकदम सुरळीत रित्या सर्वांना वेळेनुसार आणि सर्वांच्या आवडीनुसार ती करत असते.
यात देखील एक हुशारी आहे. कारण किचनमध्ये काहीही बनवायचं म्हटलं तर त्याचा मोजमाप प्रमाण वेळ कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने बनवायचं हे फक्त तिला ठाऊक असतं. काही पुरुषांना चहा बनवायला सांगा. ठीक आहे चहा बनवतील पण जर तुम्ही त्यांना सांगा की चला ही भाजी बनवून दाखवा बरं. तर त्यांना तितका अंदाज येणार नाही. युट्युब वर बघतील करतील पण तरी त्यांना अंदाज नाही कळणार की हा पदार्थ कसा होईल. की हा पदार्थ खरं चांगलं होईल का. किंवा ते त्या पद्धतीने करतील पण तरी अंदाज त्यांचा कमी-जास्त नक्कीच होणार पण स्त्रीचा तसं नाहीये. ती रोज सकाळ संध्याकाळच्या बनवणाऱ्या गोष्टींपासून नवीन काही शिकत असते. आणि अचूक तिचं मोजमाप डोळे बंद करूनही जर तुम्ही करायला लावला. तर ती मोजमाप करून बरोबर योग्यरीत्या ती सगळ्यांना आवडेल अशी भाजी पोळी अनेक पदार्थ ती बनवेल. तुम्हीच बघा ना सकाळी एक जनाचा चहा बनवायचा आहे चार जणांचा चहा बनवायचा आहे किंवा घरात 12-13 मेंबर असेल त्यांचा चहा बनवायचा आहे. तेथे अचूकपणे साखर किती टाकायची हे तिला माहित असते आणि मला वाटते हे फक्त स्त्री लाच जमते. तुम्ही म्हणाल हे तर तिचं कामच आहे. हो हे तिचं कामच आहे पण तिने हे सर्व शिकायला क्लासेसे नाही ना केले. पण तरी तिने स्वतःच्या आईला /सासून बाईकडून शिकत शिकत ती स्वतः पण मोठी झाली. आणि ह्या गोष्टी सर्व मॅनेज करायला शिकली.
तुम्ही याच ठिकाणी तुम्ही एखाद्या पुरुषाला उभ करा. आणि त्याला सांगा असं करायचं फक्त एका दिवसासाठी हे त्याच्यासाठी खूप मेहनतीचा असेल. तो म्हणेल मी माझ्या मी माझ्या ट्वेंटी फोर आवश्य काम करून घेईल. पण किचनमध्ये माझ्यासाठी खूप कसरते. ही सगळ्यात मोठी कसरत म्हणजे माझ्यासाठी स्वयंपाक घर. असा तो सहजपणे बोलून जाईल. महिलांना साधी फोडणी द्यायची त्याच्यात मोहरी किती हिंग किती जिरे किती? हळद किती हळद कमी प्रमाण जास्त प्रमाण झालं तर त्यामध्ये पण कडूपणा येऊ शकतो. तिखट मीठ किती हवय याचा सुद्धा त्यांना अंदाज एकदम परफेक्ट नुसार असतो. आणि तुम्ही बघा ना वेळोवेळी केले जाणारे पंचपकवार असो किंवा सणानुसार केले जाणारे चिवडा लाडू चकली ते देखील ती करते मेहनत घेते म्हणून तिच्यामुळेच तर आपण घरात सगळे आनंद घेत असताना प्रत्येक सणाचा असो किंवा की आपापल्या मूड नुसार असो फोडणीसाठी तेल तापले हे तिला कळतं. भाजी शिजली की भाजी नाही शिजली आहे अंदाज दिला असतो.वेळोवेळी भाज्यानुसार नाष्ट्यानुसार गॅस कमी जास्त कसा ठेवायचा हाही अंदाज दिला योग्यरीत्या तिला असतो.आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अचानक घरी पाहुणे आले आणि जर त्यांना एका खूप कमी वेळेत जर त्यांना चार पदार्थ बनवायचे असेल ते आहे एवढा मोठा अंदाज त्यांना अगदी सुरळीतपणे त्या पार पडतात.आणि हे सगळं करतानl ओठ्यावरचा जो पसरला असतो थोडेसे चिकट पडलेलं खरखट पडलेलं ते देखील ते आवरून घेत असते तेच काय ते करता करता इकडे कुकरची शिटी होईपर्यंत ती बेसिन मध्ये असलेले भांडे सुद्धा पटापट लगबगिने ती घासत असते वेळेचे मॅनेजमेंट करून ती आपली ही कामे करता करता दुसरी कामे देखील ती करत असते आणि सगळ्यांच्या वेळेनुसार ते सगळ्यांना त्यांच्या वेळेनुसार ते ताट लावून रेडी ठेवते साधी पोळी करायची म्हटली तरी देखील तिचा किती लाटी घ्यायची ती कशी लाटायची कशी शिकायची हे सुद्धा अंदाज दिला असतो उरलेल्या शिळ्या आणण्याचं पुन्हा काहीतरी छान प्रकारे ती बनून आपल्याला देत असते हे सगळं करता करता लक्षात आलं की महिलांना फक्त स्वयंपाक नाही स्वयंपाक घरात नियोजन करावे लागते त्यातही हुशार आहे.
गणित आणि आणि विज्ञान हे आपल्याला शब्दात आणि आकड्यात अडकवून ठेवतात आणि त्याच्यावरून ठरवतात की ही किती हुशार आहे निसर्गाने अंगभूत दिलेले आपली ही शक्ती आपण स्वतः ओळखायची असते आणि आपण ती उत्तम रित्या रोज पार पाडत असतो पण आपण काय विचार करतो आपल्याला इंग्लिश येत नाही आपल्याकडे डिग्री नाही आपले मार्क्स देखील असेच होते तसेच होते आणि आणि आपण आपल्या अंगभूत असलेल्या हुशारी विषयी नजर अंदाज करतो एक दिवस आपण केलेल्या स्वयंपाकाकडेच एकदा तटस्थपणे बघावं त्याचं कौतुक करून पहावं आणि खरंच आपण किती हुशार आहोत हे आपण ठरवावे स्वतःलाही स्वतः जाणीव करून द्यावी यासाठी कोणाची वाढ कशाला बघायला हवी कारण की थोडसं वाईट झालं तर लोक लगेच बोलून दाखवतात ते घरातले असो की बाहेरची असो पण जर छान झालं तर तेच लोक काहीच बोलत नाही चार घास मात्र नक्की एक्स्ट्रा खातील पण कौतुक केलं आणि नाही केलं त्यांना काही फरक पडणार नाही करणारे करतातही आणि बायकोने मी नेहमी नेहमी विचारते म्हणून सांगणारे सांगतात हे आपल्या कौतुकाची थाप आपल्या हुशार याची थाप आपणच घ्यावी कारण अशिक्षित स्त्री देखील हे उत्तमरीत्या पार पडत असते आणि ती त्यांची अंगभूत हुशारी असते मला याचं खरंच कौतुक आहेआपण दोन वेळा तीन वेळा जे स्वयंपाक करतो चविष्ट पदार्थ आपण सगळ्यांना खाऊ घालतो ते या दृष्टिकोनाने बघावं आणि त्यांचे मोल ओळखावं… खाण्यापूर्वी निसर्गाने सढळ हस्ते दिलेल्या आपल्या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत…
माझा हा लेख प्रत्येक स्वयंपाक घरासाठी आणि स्वयंपाक घरातील प्रत्येक बुद्धिमान महिलांसाठीमहिलांसाठी…