Social

कोणतंच संकट मोठं नसतं, समजदारी हवी

काय म्हणता, तुम्ही स्वतःच्या घरात राहता ?
नक्की ? पुन्हा विचार करा, खरंच कां तुम्ही स्वतःच्या घरात राहता. की टीव्ही च्या घरात राहता ?
एक काम करा, तो जो टीव्ही आहे ना,
तो फक्त अडगळीच्या खोलीत टाका !
आणि फरक बघा,
एक दिवस गेला,
दोन गेले,
काही चुकचुकल्यासारखं वाटतंय कां ?
नाही! अरे व्वा! दोन दिवसातच, अगदी सदासर्वकाळ चालू असणे जरुरी असलेली गोष्ट सुद्धा तुम्हाला आठवत नाही. तो असेपर्यंत अगदी बायको पण आसपास नसली तर तुम्हाला चालत होती, किंबहुना टीव्ही बघतांना ती सदा एक अडचण वाटत होती, कारण तुम्हाला जे बघायचं ते ती तुम्हाला बघू देत नव्हती, कारण तिला काही वेगळंच बघायचं असे, होय ना ?

यालाच म्हणतात, दुखती रग, फार महत्वाची, नसली तर, जास्त दुखायची, अहो जरा २ मिनिटं बघू द्या ना, तिला मुल झालं कां, तिची खूप इच्छा आहे हो, एक गोजिरवाणी मुलगी तिच्या कवेत असावी, तिच्या अवती भवती किलकारी मारत गोल गोल फिरावी, हाताने उंच वर फेकून हळूच झेलावी, पकडापकडी नाही, तिच्याशी शिवाशिवी खेळावी मोठी झाली, ना ती! रोज शाळेतून आली की, शाळेत घडलेल्या त्या सर्व गोष्टी सांगेल जशी ती स्वतः आईच्या अवतीभवती फिरून सांगत असे !

अचानक ती ओरडली, नाही नाही मी मुलीला शाळेत पाठवणारच नाही. तो राक्षस तिलाही गुदमरवून टाकील, त्या अतिविक्राळ राक्षसाची योनीत एक जोरदार मुसंडी, खूप वेदना देणारी कळ येईल आणि त्या वेदनेच्या तो काय करतोय समजेतोवर तीला फक्त वेदना जाणवतील, पुन्हा काही वेळाने, पुन्हा काही वेळाने आणि तीही अर्धवट बेशुद्ध होईपर्यंत. त्या अर्धबेशुद्धीत आणखी वेदना, आणखी वेदना, तोंड उघडलं नाही तर जोरात थोबाडीत मारल्या आणि दोन्ही बाजूला तोंडही फाटलं जे उघडं राहीलं ते बंद झालंच नाही फक्त वेदना होताहेत इतकंच जाणवत होतं शुद्ध असून काय चाललंय तेही समजत नव्हतं, जाणवतंच नव्हतं इतकं फाटलेलं तोंड दुखत होतं. तिकडे आई म्हणे जोरजोरात रडत होती तशी मीही…..

शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका चौकीदार, घंटा वाजवणारे म्हातारे काका शोधतील, १-२ तासांतच पोलीस येतील, सर्वत्र शोधाशोध सुरू होईल, आजूबाजूच्या भागात, नेहमीचे रिक्षावाले, भाजीवाले, चॉकलेट मिळणाऱ्या टपऱ्या, सर्वत्र विचारपूस झाली, पण ती सापडली नाही. आणखी कोण कोण या भागात येतं आलं, याद्या झाल्या आणि कोणाकोणाला विचारले, नाही विचारले गेले खुणेच्या याद्या झाल्या. एक रिक्षावाला बोलला साहेब, एक भंगारवाला पण लिहा, आता दिसत नाहीय.

३-४ भंगारवाल्याना बोलावलं, इकडं कोण कोण येतं. साहेब आम्हीच येतो पण इथला दिवस आज नाही म्हणून आज आम्ही इकडं येत नाही म्हणून आलो नाही. पण एक जण घाबरत घाबरत बोलला, साहेब, अजून एक जण इकडं येतो, कधी इकडं दिसला नव्हता. साहेब हा गर्दुल्या सदा नशेत असतो, याला काही उमजतपण नाही, कोण आलं अन कोण गेलं, या शाळेजवळच्या कचरापेटीत खायला शोधत असतो. तो बोलला, नाही साहेब एक जण आलेला न्हाई दिसत, भंगारवालाच हाय, लई चांगल्या कपड्यात असतो. लगेच भंगारवाले मारायला उठले, बोलले ‘सायेब हमारा नेमीचा धंदा, हमकू पता नही ऐसा हो नही सकता। कोई नया हमारे धंदेमे सेंध नही मार सकता।’

तेवढ्यात शाळेचे एक जुने शिपाई धावत आले, साहेब, एक पहारेदार चौकी खुलेना. अरे ती तर नेहमीच बंद असते, जेव्हापासून सदामामा देवाघरी गेले. न्हाई साहेब ४-५ दिवसापासून वरच्या मजल्यावरून ७-८ वेळा ती खुली दिसली, म्हनलं सदाच्या जागी कुणी नविन आलं असेल कुणी. अरे पण तिकडे तर मुली आणि मॅडम टीचर्स नेहमीच येत जात असतात तिकडेच पुढे तर पूर्वी त्यांच्या टॉयलेट होत्या ज्या जरा बाजूला असुरक्षित जागी म्हणूनच वापरायला बंद केल्या.

पण त्यांचं न ऐकता पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवलाच. तिथे झालेल्या हालचालीच्या खुणा दिसत होत्या त्या छोट्या चौकीचा दरवाजा जबरीने उघडला गेला, आत एक ९-१० वर्षाची मुलगी कपडे फाडलेल्या अर्धनग्न अवस्थेत बेशुद्धावस्थेत पडलेली होती, एका पायात बूटही नव्हता ना पायमोजा होता. तोंडात दोरी बांधल्याच्या दोन्ही बाजूला जखमा आहेत अस वळ होती, तोंडातून वीर्य बाहेर आलंय पण रक्त फारसं नाही म्हणजे तोवर ती थकलेली असावी थकल्यावर तोंडात आत एक रुमाल कोंबलेला होता, जो काही खास असल्याचं दर्शवत होता, बहुतेक तिथून जाण्याअगोदर कोंबलेला असावा.

प्राथमिक माहिती लिहून घेतल्यावर तिला लगेच जवळ दवाखान्यात नेलं पण डॉक्टरने इमर्जन्सी केस आहे, ताबडतोब मोठ्या दवाखान्यात न्यायला लागेल सांगितलं. पोलिसांनी काही एमर्जन्सी औषध घेऊन सोबत त्यालाही येण्याची विनंती केली.

तिचा श्वास अडकलेला आहे पण मंद चालत आहे, तिला जास्त वेळ बेशुद्धीत राहण्यासाठी काहीतरी दिलं गेलेलं दिसतंय. तिला ओरडून आवाज बाहेर येऊ नये म्हणून तोंडातून घशात काहीतरी ढकललेले लक्षात येत होते जे सहजी निघालं नाही आणि तिथे काढणे शक्य नव्हते. नाडी मंद होती याचा अर्थ जणू त्या बलात्कार करणाऱ्याला फार्मसीज्ञान वा जनावरांच्या तस्करीतील औषधी माहिती असावी.

या लहान पण ताकदवर मुलीने खूप प्रतिकार केलेला दिसतोय होता कारण तीने नखांनी खोलवर ओरबाडलेले तिच्या नखांतील मांसावरून आणि हातावरील रक्तावरून दिसतंय जे तिचं नाही पण तळहात सोडून तिच्या बाह्य शरीराला जखमा नाही, तिचा बलात्कार नक्कीच झालेला आहे, पण योनी आणखीही काही दर्शवितेय. आत काहीतरी आहे. कशाने तरी घसा दाबून धरण्याचा वा हात बांधण्याचा प्रयत्न झालेला होता काही अडकलेले होते. बहुतेक एकापेक्षा जास्त असावे, २ वा ३ सुद्धा. योनीच नव्हे, मलमार्गही जखमी आणि रक्ताळलेला आहे. आणखी बरंच काही.

मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी मला वाचवले. नेहमीप्रमाणे तो/ते राक्षस कधीच सापडले नाहीत. मी मोठी झाले. तोपर्यंत मला माझ्याशी काय काय झालं होतं ते समजण्याइतकी मोठी झाले. आणि तोवर मला लग्नच करायचं नाही, असंच मी ठरवलंही होतं. कोणत्या तोंडानं कुणाला हो म्हणून फसवू?

आणखी मोठी झाले, दरम्यान काही मानसिक उपचार केले आणि अखेर माझं लग्न झालं, एक मुलगा झाला, २ वर्षांनी ही गोड मिठ्ठु, Bunny पण म्हणतो आम्ही तिला, झाली आणि आता मी नॉर्मल झाले, असं मला वाटत होतं. आता तिला शाळेत भरती करायचं, पण मी अजूनही माझ्या वेदना विसरले नव्हते, आणि त्या माझ्या मुलीने भोगाव्या असं साहजिकच मला वाटत नव्हते.

मी पतीला त्यांना न माहीत असलेला, माझा भूतकाळ, माझं Unknown Past सांगायचा निर्णय घेतला आणि एक दिवस रात्री डायरी त्यांच्यासमोर ठेवली. हे काय? त्यांनी विचारलं. माझी कथा आणि व्यथा.

मला Madhuban मधुबनला शाळेत पाठवायचं नाही. मिस्टर म्हणाले, हे सर्व मला माहित आहे. लग्नाअगोदरपासूनच मला बाबांनी सांगितलं होतं.

काssय? तुझे बाबा! आणि त्यांना हे माहीत आहे! हेss आईs अंबाबाई, मला उचलून घेऊन चल गं लवकर, आत्ताच. आता उद्यापासून त्यांना कसं तोंड दाखवू? पण त्यांना कसं रे माहीत?

तेss, ते जे डॉक्टर होते ना, तुला पोलिसांबरोबर मोठ्या दवाखान्यात घेऊन जाणारे, तेच तर माझे बाबा जे आपल्यासोबत गेल्या ३ वर्षांपासून राहताहेत आणि तुझी मानसिक ट्रीटमेंट करणारे Psychiatrist त्यांच्याच मोठ्या भावाचा मोठा मुलगा. आपल्या घरात सर्वांना सारे माहीत आहे, तुझ्या सासूलासुद्धा. खरं म्हटलं तर तिच्याच पुढाकाराने आपलं लग्न झालं.

त्यांनी तुला सांगितलं आणि तरी तू माझ्याशी लग्न केलंस, ती आता हमसून हमसून रडू लागली होती. आता उद्यापासून या सगळ्यांना कसं तोंड दाखवू. आता मला तुम्हां सगळ्यांच्या डोळ्यांत दयाभाव दिसणार आहे की तुम्ही सर्वांनी मला माझ्यावर दया करून स्वीकारली. आता हा आणखी एक न्यूनगंड माझ्या मनांत निर्माण झाला.

लगेच तो म्हणाला, घाबरू नको, Psychiatrist आहे ना आपल्याच घरांत.

पण आता मी सगळ्यांना कसं तोंड दाखवू, मला खरंच सगळ्यांनी माझ्यावर दया केल्यासारखं वाटतंय.

इतकंच ना! चल, उद्यापासून तुझं नांव दया. ते एका हिंदी सीरियलमध्ये नाही कां दयाभाभी, तशी तू कलसे सबकी दया. ओके. झोप आता. आणि ती, तशीही स्वीकारली गेली यासाठी आनंदाश्रू गाळत गाळत केव्हा झोपली ना तिला ना मला पत्ता लागला. मला कारण आता मुलीला म्हणजे ‘मधुबन’ला कसं शाळेत शिकायला पाठवायचं हा भलामोठ्ठा प्रश्न माझ्यासमोर उभा होता!

असो! असं म्हणतात, प्रश्नांच्या अगोदर उत्तर तयार असतं, खास करून स्त्रियांकडे. मोठी आई, आई आणि मोठी वहिनी एकच तर आहे मानसिक डॉक्टरची बायको जशी तारका ची तानी तशीच मारका नाही पण मानसि उर्फ मानी, आता काहिही म्हणायचं म्हणून मानसिक डॉक्टरची मानसिकता म्हणून तारे तोडू नका. ‘मानसि’च ठीक आहे लागलं तर त्याला ‘मानसि’ चा मानसिक प्रेमी समजा.

एक लक्ष्यात आलं कां, मोठी आई म्हणजे मोठी सासू, आई म्हणजे सासू आणि मोठ्या भावाची बायको म्हणजे अक्कडसासू, ३-३ सासवांच्या हाताखाली ‘दया’ होईल कां सगळ्यांची ‘दया’.

“कोणतंच संकट मोठं नसतं, जेव्हा दर्या पार करविणारे आणि समजविणारे आणि समजूतदार घरातंच असतात. आणि तीच घराची खरी ताकद असते”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button