Social
मॉडर्न जीवन पद्धत
फक्त एक विचार !! पटलं तर नक्की विचार करा
“नदीत किंवा तलावात आंघोळ
करायला लाज वाटते,
आणि
स्विमींग पूलमध्ये पोहण्याला
फॅशन वाटते.
गरीबाला एक रुपया दान
नाही करु शकत,
आणि
वेटरला मात्र १०रु. टिप देण्यात
मोठेपणा वाटतो.
पंक्तीत बसून जेवणे ही जुनी
पध्दत वाटते,
आणि
पार्टीत खाण्यासाठी रांग
लावण्यात छान वाटते.
बहीण काही मागत असेल तर
फालतू खर्च वाटतो,
आणि
गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य
समजले जाते.
गरीबाकडून भाजी घेण्यात
कमीपणा वाटतो,
आणि
शॉपिंग मॉलमध्ये,आपला
खिसा रिकामा करण्यात
अभिमान वाटतो.”