Social

दामिनी पथक

तू नारी है, हाँ तू नारी है, तू ही जग से न्यारी है. तू कमजोर है, ये तेरी सोच है. तू बेटी, बहन, माँ का रूप है. तू ही काली, जगदम्बा का स्वरूप है. तेरी जग से प्यारी सूरत है. तू ही विकराल रूप की मूरत है. डर मत, तू अपनी शक्ति को याद कर. अपना सर उठा, नज़रे मिला, फिर नज़रों से वार कर. दुश्मनों का संहार कर.

दामिनी पथक…👩🏻‍✈️🧑🏻‍✈️👩🏻‍✈️
दामिनी पथकांच्या दुर्गा कशा काम करतात …
समाजामध्ये अशा अनेक तक्रारी असल्या तरी पोलिसांपर्यंत जात नाही आणि महिला त्या अन्याय सहकारीच जातात महिला वर्ग असो किंवा कन्या वर्ग असो अन्याय त्यांना सहन करावा लागतो, अशावेळी त्यांच्या मदतीला कोणीही येत नाही किंवा त्याही पाऊल उचलत नाही. पण आता प्रत्येक शहरात पोलिसांचे दामिनी पथक महिलांच्या संरक्षणासाठी आणि तक्रार निवारण्यासाठी सदासक्षम असतं आणि त्यासाठी दामिनी पथक बनवण्यात आलेलं आहे.
मुली महिलांना संरक्षण देण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय अंतर्गत हे पथक कार्यरत आहे. महिला किंवा मुलीनीं फोन करताच दामिनी पथक घटनास्थळी जाऊन त्यांना मदत करते प्रसंगी दंडुका दाखवून छेडखानी करणाऱ्यांची धुलाई केले जाते. विद्यार्थ्यांच्या अडचणीवर रोड रोमियो कडून होणाऱ्या त्रास विचारात घेऊन पोलीस ठाण्याच्या स्तरावर दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शैक्षणिक संस्था हॉस्टेलला भेट घेऊन या विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेतात.

मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना दामिनी पथकाने पोलीस खात्यात दाखवून चांगले अद्दल घडवली आहे. कोणाच्या गांभीर्य पाहून काही जणांवर खटले काहींवर फौजदारी कारवाई केली तर अनेकांना समज देण्यात आले आहे. छोटीशी तक्रार देखील संवेदनशीलतेणे यापथकाकडून हाताळले जात आहे. यासाठी हे दामिनी पथक सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत परिसरात गस्त घालत आहे. त्यामुळे मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण कमी झाले. पोलीस प्रशासनाने सांगितल्यानुसार मागील काळात शहराच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आणि पोलिस आयुक्ताला गुन्हे आढावा बैठक घेतली होती या बैठकीसाठी सर्व पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत महिला सुरक्षा बाबतचे उपक्रम राबवणार देखील भर दिला होता गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर बचत निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.
महिला सहाय्यक कक्षा तर्फे दामिनी पथकाचे काम चालतं दामिनी पथकाचा एक महिला हेल्पलाइन नंबर वरती कॉल केल्यानंतर हा कॉल कंट्रोलला जातो, कंट्रोल संबंधित विभागामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जातो ठिकाण संबंधित जमिनींना कॉल केला जातो आणि त्यानंतर ते दामिनी तात्काळ त्या ठिकाणी मध्ये साठी पोहोचत असते.

आव्हानात्मक कामे… ह्या दामिनी खरंतर फार अवनात्मक काम करत असतात अनेक प्रकारचे अनेक गुन्हे आणि अनेक तक्रारी त्यांच्याकडे असतात प्रत्येकाचे वेगवेगळी तक्रार आहे. कधी नवरा बायकोचे भांडण तर कधी मुलगा घरी सोडून पळून आला असेल, कधी प्रेम भंग झाला म्हणून भांडण झाले. आत्महत्याचे प्रवर्त झालं असेल तिला आत्महत्या पासून दूर करणे ,एखादी व्यक्ती आत्महत्या करत असेल तर तिचं मन वळवणे असे अनेक आभानात्मक कामे आहे. कधी कधी महिला ड्रिंक करून पडतात त्यांना उचलून घेणे कधी कधी काही ठिकाणी तोंडातून फेस येतो तो चक्कर येऊन पडतो त्यांना उचलून दवाखान्यात नेणे तसेच लहान मुलं असतात जे बाहेर सोडले जातात. त्यांना पकडून त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचणे एखाद्या वेळेस एखाद्या शहरातून एखादी महिला मिसिंग झाली असेल ती या शहरात याची माहिती मिळत असेल तर या त्या महिलेचा शोध घेणे.

समाजातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे अनेक गुन्हे असतात जे पुढे येत नाहीत किंवा त्यांचे तक्रार येत नाहीत त्या तक्रारी ऐकून घेणे त्यांची त्या स्तरावर तीच निरसन करण्याचे काम हे दामिनी पथक करतात . तिथेच झालंच नाही तर पुढील संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येते वेगवेगळ्या दामिनीने वेगवेगळे अनुभव आव्हान आहे जे फार अवनात्मक आहे.

हे सगळे होत असताना..
एक महिला म्हणून सातत्याने उल्लेखनीय काम करणे हे करत असताना कधी कधी जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये या महिला कर्तव्याला प्राधान्य देतात. आपल्या सगळे कौटुंबिक काम बाहेर ठेवतात. कॉल आला की लगेच सगळे महिलांच्या मदतीला जातात खरं तर ह्या सगळ्या दुर्गा आहेत ज्या खरंच स्त्रियांचे संरक्षण करतात. अशा पद्धतीने काम करतात आणि जेणेकरून समाजामधील महिला सुरक्षित राहिले पाहिजे तिला छोट्या छोट्या कारणासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार नाही. याचे उत्तर त्याच ठिकाणी प्राप्त होईल असं काम करत आहेत .


पुणे शहर शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र मानल जात आणि इथे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात त्यात मुलींचे प्रमाण मोठे आहे फक्त शिक्षणासाठीच नाही तर नोकरीच्या अनुषंगाने देखील महिलांचा वावर वाढला आहे. मात्र या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे सार्वजनिक ,औषधे, सुरक्षितता ,यात अनेक धोके येतात त्यात महिला तरुणी , विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारे छेडछाड ,मंगळसूत्र लंपास करणे , शाळा, कॉलेज ठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास बलात्कारा सारख्या घडणाऱ्या घटना आहे. त्यापासून महिलांना सुरक्षित रित्या समाजात वावरता याव यासाठी महिला मार्शल पदक दामिनी पथकाची स्थापना 2015 मध्ये केली होती. दामिनी पथक हे दोन टप्प्यांमध्ये काम करणार आहे. पहिला टप्पा म्हणजे पोलीस गणवेशात एक पथक शहरात गस्त घालण्याचे काम करेल तर दुसरा पथक बाईकवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालेल.
दुसरा टप्पा म्हणजे दुसरे पथक गुन्हे शाखेच्या अधिपत्याखाली काम करणार आहे थोडक्यात यांचं काम वेगळं असणारे या पथकाकडून शाळा महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले जाणाऱ्या दामिनी मार्शलने शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या मुली आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करून जागृती निर्माण केलेली आहे. या पथकानुसार महिलांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांकडून आयटी आणि इतर कंपन्या मॉल, बस स्टॉप ,गार्डन ,मार्केट ,झोपडपट्टी ,रेल्वे स्टेशन ,धर्मस्थळ आणि इतर ठिकाणा भोवती गस्त घालने आणि तेथील सुरक्षिततेच्या दृष्ट कोणातून उपाययोजना करणे हे हा पुणे शहराच्या दृष्टीने उद्देश असल्याचे पोलीस प्रशासन सांगते गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारांना वाचक निर्माण करणे आवश्यक आहे त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. शहरात दामिनी पथकाच्या स्थापनेमुळे शहरातील युती महिलांचा आत्मविश्वास वाढला असे एकंदरीत इतिहास सांगतो.

घाबरू नका, १०९१, १०९८ या नंबरवर फोन करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button