Her Love

स्त्री

दिवस निघाला

झोप होवो ना होवो पण तिला तर उठावंच लागत ना

तर ती म्हणजे कोण… कोण म्हणजे काय ??

ती म्हणजे स्री ..!! बरोबर नं

घरामध्ये २४ तास काम करणारी म्हणण्यापेक्षा राबणारा महिलावर्ग .. अगदी १००% खरं

मग त्या बाहेर जॉब करत असो व नसो. तिला घरातील काम तर करावीच लागतात. बाहेर जॉब करणाऱ्या स्रीयांना तर घरकामासाठी बाई लावणे म्हणजे खूपच थाट माट केल्यासारखं तिला दाखवून दिला जातं. घरच्या मंडळींनी जर स्वतःहून लावून दिली तर गोष्ट वेगळी. चालू तर मग बघूया हि आजची स्री माझा मताप्रमाणे,

जेव्हा ती आई-वडिलांच्या घरी असते तेव्हा ती राजकुमारी सारखी असते. तिच्या बेधुंद जगात वावरत असते. तिच्या त्या स्वप्नात रमत असते. स्वप्न बघता बघता ती तिचा घराची महाराणी आता कोणाची तरी राणी बनते आणि राणी बनताच तिला अजून एक नकळत पद भेटते .. ते म्हणजे #महाराणी #राणी # नौकरानी .. कारण अक्षदा पडताच तिच्या वर जबाबदारी चे ओझे पडते.. तुम्ही म्हणताल ओझे पुरुषांवर पडत नाही का. पडतं हो पण खरचं विचार केला ना ती स्वतःच अस्तित्व विसरून या जबाबदाऱ्या स्वीकारत असते प्रत्येक वेळेस न्याय मागता येत नसतो आणि भेटत सुद्धा नसतो. म्हणूनच आज या माझ्या लेखाद्वारे तिला मांडण्याचा प्रयत्न करतीये मी एक स्री.

तिचं लग्नानंतरच घर कितीहि अंबानी असल तरी तिला तिच्या मनाप्रमाणे नाही तर तिच्या सासरच्या मंडळी प्रमाणे च वागावं लागत असतं आणि जर चुकून चूक देखील झाली तर एक टॅग लागतो.. आईवडिलांनी काय संस्कार दिले बाबा.. कमाल कि ..अशाप्रकारे. माणूस म्हंटलं तर चुकतोच पण तिच्या आयुष्यात हे मान्य करायला कोणी तयार नसतं आणि जर मुद्दाम काही बोललीच तर बापरे बाप भोभाट ४ घरी गेल्याशिवाय थांबत नाही. म्हणजे कसं सासू देखील एक सूनच असते तिने सुनेला समजून घायचं असतं.. तिने तिला सोबत दयायची असती..तिने तिला चुकल तर शिकवायचं असतं .. तिने तिला हातात हात घेऊन पुढे न्यायचं असत.. तिनेच तिला आधार द्यायचा असता. पण असा खुपचं क्वचित असत.

घरातल्या सुनेने कितीही चांगलं वागू दे तिची एक गोष्ट तिने स्वतःच्या मनाप्रमाणे केली तर मग तिची गराने करत असता बग ती अशी वगतीये! बग  ती अशी राहतिये! बग ती तशी करतीये!.. अरे ती तिची लाईफ तिला तिच्यानुसार जगू द्या न..तिला तुम्ही समजून नाही घेऊ शकत तर किमान असा तर वागू नका. तिला तिचे तिचे घर चे बंधनं कमी असतात का ..!!

तर आपण कुठे होतो दिवस निघाला अन तिचा दिवसाचा प्रवास सुरु झाला. अर्ध्या रात्री जग आली तरी ती उद्या काय काय करायचंय हे तिच्या डोक्यात आल्या शिवाय राहत नाही. शेवटी जबाबदारी हो बघितली ना महाराणी  वरून राणी आणि राणी वरून नोकरांनी चा सफर.. जॉइंट फॅमिली मध्ये असली कि सकाळी उठते सासू सासऱ्यांना पहिले चहा देते स्वतःला मिळो न मिळो त्यांना देणार …दूरच जग बगायला गेलं तर हल्ली काळ बदललाय .. रोमँटिक नवरे आपल्या बायको ला बेड टी स्वतः बनवून देतात .. तेव्हा असा वाटतं पण माझा सारखी नशीबवान कोणी नाही. त्यावेळी त्याची बायको अश्या स्वप्नात जाते कि तिला ती महाराणी पेक्षा मोठ्या पदावर वाटते . हे पण छानच आहे मधून मधून खरंच गरज असते तिला कौतुकाची. तिचा हा पद चहाच्या एका कपावर पण डिपेंड असतो . एवढाच काय तुम्ही प्रेमाने हसतमुखाने काहीही न करता तिचा सोबत वेळ घालवता ना तिच्यासाठी तो पण खूप असतो.

मला तर फक्त असा सांगायचंय कि तिची दिवसभराची सुरुवात हसतमुखाने करा ..प्रेमाने बोला .. तिचा येणार प्रत्येक दिवस सुखात राहील . कामाचं तिला काही नसत कधी काही त्रास झाला तरी ती कोणाला बोलणार नाही आणि कामात कुठेही कमी पडू देणार नाही…  ती करतेच पण त्या कामासाठी जर तुम्ही एवढी छोटी गोष्ट  तुमच्याकडून करू शकत असाल तर तिला याच्यापेक्षा मोठी सॅलरी कुठेच भेटणार नाही कारण ती स्वतःला महाराणी असल्यासारखी जगात असते.  तर कराल न आजपासून एवढं तिचा कामाची लिस्ट तर नक्कीच करून बघा. एक दिवस घरात राहून बघा ..ती किती निवांत असते घरात राहून पण.. तीच डोकं नेहमी पुढच्या कामाचा विचारत करत असता.

घरात लहान बाळ असला कि रात्र देखील तिच्यासाठी दिवसाचं असतो. सांगायचं उद्देश हाच कि तिच्या बाजू तुम्हीच मांडा आणि तुम्हीच सोडवून द्या. शेवटी तिचं पण आयुष्य आहे तिला पण पाहिजे तसा जगू द्या. कधी काही प्लँनिंग करायच्या असतील तर तिला आवडणाऱ्या पण करून बघा. जसं ती नेहमी सॅकॅरीफईस (त्याग) करते तुम्ही पण करून बघा ना. नेहमी तीच का करणार.

तिला नेहमी बाहेर जाताना कुठे जातीये कशाला जातीये .. !!! काय गरज विश्वास नाही का तिच्यावर. का खरंच तुम्ही नेहमी सेफ्टी च बघत असता. स्वतःला विचारा आणि तुम्हीच तिला मोकळा श्वास घायला शिकाऊ शकता. अरे एवढं सगळं होत असताना नाही लक्षात येत. ती वेळेला पण वेळ निघून गेल्यावर तिला कळते ती कशी वागतीये तिच्या प्रायोरिटी तिची फॅमिलीच बनते .. का बरं .. चिडचिड होते ..शेवटी आठवण येईलच ना आधीची .. वडिलांची परी असल्याची .. आधीचे दिवस खरंच गोड होते .. आता पण तिच्या साठी हे दिवस गोडच आहेत. यात तुमचा थोड्या सहकार्याने अजून गोडवा घेऊन या.

कधी कधी गोड तिचं आवडतं स्वीट घेऊन जा छान वाटेल तिला त्यातचं आणि हो सोबत एक जादूची झप्पी .. खरंच तिच्यासाठी फक्त तिच्या ह्याच मेडिसिन आहेत … खात्री करा मी एक फार्मासिस्ट आहे …

भारती  बैनाडे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button