Social

नवरात्रीचे अध्यात्मिक महत्व

रावणाने सिता ऊचलून नेली. सितेने काहीच प्रतीकार नाही केला. रामाचे भरोश्यावर थांबली. पती येईन अन माझी सुटका करेल. तीचा पतीवर प्रचंड विश्वास होता. म्हणूनच हनुमानालाही नाही जुमानली. तीला दुसर्याला क्रेडीट द्यायच नव्हतचं.

पंरतू आता रामा सारखा कोणीच नाही. अन हनुमाना सारखा विश्वास ठेवावा असा कोणी मानुस ही नाही. आता स्रीलाच स्वत:च रक्षण करायच आहे. प्रत्येक स्री मध्ये दुर्गेची शक्ती येवो याच करीता घट स्थापना. माझ्या व्यक्तीगत दृष्टीकोनातून नवरात्रीचे अध्यात्मिक महत्व हेच आहे.

नऊ दिवसाचे उपवास आणि नऊ रंग म्हणजे आपल्यामंधील एक एक अवगुन सोडणे. अन शेवटचे दिवसी रावण दहन म्हणजे नऊ दिवसाचे सोडलेले अवगुन यांच दहन करणे. मनुष्यच राम ही आहे अन रावणही आहे. ऐवढ सर्व झाल की मनुष्यातील उरतो फक्त रामच…माझ्या व्यक्तीगत दृष्टीकोणातून नवरात्रीचे अध्यात्मिक महत्व हेच आहे.

झाली घटस्थापना घरोघरी… मांडली पुजा घरोघरी… स्थापना झाली मांडली पूजा आमच्या ही घरी…. स्त्रीशक्तीची पुजा होईल आता घरोघरी ???

स्रीशक्तीची पूजा खरच मनोभावे करतो काहो कोणी ! श्रध्दा – आस्था कमी – नाटकच आजकाल करतो मानुस. पुजा करतो स्रीशक्तीची – जयघोष करतो स्री शक्तीचा – आई उदे उदे ग अंबाआई ! जय जय अंबे !! जय दुर्गा माता !!! जय भवानी माता !!!! बेंबीच्या देढा पासून बोंबलतात. हाच जयघोष जर प्रत्यक्ष जिवनात ऊतरवला असता तर …. जन्मापुर्वीच गर्भात नसती मारली गेली असती स्री. वखवखलेल्या नजरा ऐवजी आदराने झूकली असती मान समोर दिसताच स्री. पण लाळच जास्त सुटते – वासना युक्त प्रेम ऊतू जाते समोर दिसताच स्री. स्त्री मध्ये आई बहिन लक्ष्मीच रुप दिसल असत….?

पण घरात लक्ष्मी म्हणून आणतांना चक्क सौदा करतात. हुन्डा मागतात अन त्या मुलीच्या जन्मदात्या आईबापांना चक्क झुकवतात. त्यांच्या कडून स्वत:चे पाय पण धुन घेतात…!!

सौदा करुन घरात सुन आणनं – किती लाजारीनवानी गोष्ट…पुरुष जातीला हा एक कलंकच आहे अस मला वाटत. ऐवढ करुन ही गुलामीच जीवन जगन तीच्या नशिबी. चूल आणि मूल या पलीकडे किंमतच नाही स्रीला एकविसाव शतक लागल तरी …

याला सर्वशी पुरुषच जबाबदार आहे…आपल्या मुलीवर जीवापार प्रेम करेल पण दुसर्याची मुलगी …एकाच शब्दात सांगायच म्हटल तर अजून ही छळवाद आहेच सुनेचा… दुस-याची मुलगी म्हणजे नौकरानी दासी समजतात… ” सास भी कभी बहू थी ” तरी तीला ही काही लाज शरम वाटत नाही… याना त्या कारणाने सडोकी पडो करुन सोडते… स्वत: स्त्री असून सुनेच्या बाबतीत मासीकधर्माच भांडवल करते… एकविशाव्या शतकातील असली सासू माझ्या नजरेने ” कैदाशीनच “

आई अंबे ! अनेक रुपे अनेक नांवे तुला – आली आहेस नऊ दिवस तर …तुझी शक्ती ऊतरु दे..कॉलेज कन्ये मध्ये – उपवर मुलींन मध्ये – नवविवाहित मुलींन मध्ये – छळ सहन करणार्या गृहीणीन मध्ये …

वाकडी नजर गेली – छळलं – सौदे बाजी केली तर …बस त्यांचे छाताडावर …घे त्यांना पाया खाली दाखवा म्हणा आपल चंडीकेच रुप तेव्हाच स्रीच जीन सुरळीत होईल… तेव्हाच नष्ट होईल सौदे बाजीची प्रथा अन छळवाद… नाहीतर दरवर्षी आहेच पुजाअर्चा… घट स्थापना अन… स्री साठी विषाचा घट भरतोच आहो आम्ही….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button